रात्री झोप छान लागली मऊ मऊ ऊशा आणि गाद्यांमुळे. पहाटेमात्र एक्दम हुडहुडी भरली. स्वतःला पांघरूणात शक्य तेव्हढ गुरफटवून टाकलं आणि परत झोपलो. सकाळी ७ वाजता अलार्म वाजला आणि दचकून उठलो. भराभर आवरल, आणि टॅक्सीसाठी लॉबीत आलो. बाहेर बघतो तर काय??? सगळीकडे धुकं पसरलं होतं. वास्तविक तिथला उन्हाळा ओसरत आला होता, पण एव्ह्ढ्या लवकर धुकं पडेल असे त्या लोकांनाही वाटले नव्हते. टॅक्सीला वेळ होता तेव्हढ्यात मी फोटो काढले.
आवारात उभ्या केलेल्या गाड्यांची पाठची बाजू
..अॅक्च्युअली मला धुके दाखवायचे होते. कॅब यायला वेळ होता त्यामुळे मी आजूबाजूला फिरून अंदाज घेऊ लागलो. मी प्रिमीअर इन नावच्या एका इन मधे थांबलो होतो. वाल्थाम अॅबे आणि चिंगफोर्ड ह्या दोन गावांच्यामधे सीवर्डस्टोन नावाचे एक चिमुकले गाव आहे, त्या गावाच्या वेशीत हे प्रिमीअर इन आहे. इथून जवळच ली व्हॅली पार्क नावाचे प्रसिद्ध पार्क आहे. तिथे गोल्फ कोर्स सुद्धा आहे आणि ह्याच नावचे एक गाव पण आहे. त्याच्यापुढे चिंगफोर्ड नावाचे एक मोठे गांव आहे. हे वाल्थाम अॅबेपेक्षाही मोठे गांव असून इथे श्रीमंत आणि उच्चभू वस्ती खूप आहे, असेही कळले. वाल्थाम अॅबेमध्ये टेस्को नावाचे एक मोठे सुपर स्टोअर आहे ही महत्त्वाची माहिती सुद्धा मिळाली. तेव्हढ्यात कॅब आली, आणि मी ड्रायव्हरच्या बाजूला बसून मस्त मजा घेऊ लागलो. छोटासा पण अगदी गुळगुळीत रस्ता, त्याच्या दोन्हीबाजूला असलेली वनश्री, आणि धुक, ह्यामुळे अगदी वेगळं वाटत होतं. वाटेत छोटी छोटी गावं लागत होती, त्यातली सुबक घरं, समोरील आटोपशीर अंगण हे बघून खूपच छान वाटलं. ड्रायव्हरदादासुद्धा बोलघेवडे निघाले. त्यांना भारतीय जेवणाची फार आवड!! आठवड्यात १-२ वेळा तरी ते टेक-अवे मधे “चिकन ठिका”,”बठर चिकन” इ.इ. हादडत असतात. त्यामुळे त्यांनी विशेष आपुलकीने बोलायला सुरुवात केली. रोज कार लागणार आहे कळल्यावर त्यांनी स्वटःहून भाड्यात सूट देऊ केली. त्यामुळे माझा उत्साह अजूनच वाढला आणि मी निसर्गाचा मनापासून आनंद घेऊ लागलो.
सीवर्डस्टोन – भाग ३
03 मंगळवार Aug 2010
Posted in Travel


