सीवर्डस्टोन – भाग ४

एक-दोन दिवसातच आमची दैनंदिनी ठरून गेली. सकाळी ऊठून आवरायच आणि मग ०८:३० च्या टॆक्सीने ऒफिसला जायच..तिथन परत संध्या. ६:०० ची टॆक्सी घेऊन ईन मधे परत. आता मुद्दा होता भाड्याने घर शोधण्याचा. ह्यात पंचाईत अशी होती की आमची मॆनेजर आम्हाला ९-५ ह्या वेळात ऒफिसमधून सोडेना आणि घर दाखवणारे एजंट्स म्हणेत आम्ही ५ नंतर थांबणार नाही कारण आमचे ऒफिस पण ९-५ असतं. २-३ आठवडे हे असंच चालू होतं. आम्हाला हे सुद्धा कळत नव्हत की आम्हाला इन मधे का रहायला सांगितलं. इन ह्या आपल्याकडील साध्या हॊटेलच्या दर्जाच्या समजल्या जातात, पण जास्त व्यवस्थित असतात. तरीही आम्हाला हे नक्कीच अपेक्षित नव्हत. आम्ही आमच्या भारतातील मॆनेजरला हे बोलून सुद्धा दाखवलं. आमच्या तक्रारी वाढायला लागल्या.

दरम्यान आम्ही वेगवेगळ्या प्रकरे आमचं रहाणं सुसह्य करायचा प्रयत्न करू लागलो. आमचे सहकारी काट-कसर किंग होते. एक रोज मॆगी खायचा. बाकीचे जवळच्या दुकानातून ब्रेड व फ्ळ आणून खायचे.सकाळची न्याहारी आणि दुपारंचं जेवण क्लायंटच्या कॆंटीनमधे. तिथे अस्सल ईंग्रजी न्याहारी आणि जेवणाचा बेत असायचा. एग्ज ऎन्ड बेकन, फ्राईड एग, कॊर्न, ब्रेड-बटर-जॆम, चीज स्लाईस ई.ई.आणि जेवणात कच्चे मांस, ऊकडलेला बटाटा, मटार इ.इ.इ. शाकाहारीच काय पण आमच्यातील मांसाहारीपण उपाशी राहू लागले.सुरूवातीला खूप मजा आली, वेगळ्या प्रकारे बनवलेली अंडी, सॆलॆड्स, मॆश्ड बटाटा इ.इ. खायला छान वाटलं. जेवणाच्या वेळी मला अजून एक धक्का बसला. मला सॆंडविच(सुद्धा) खायचे होते, म्हणून सॆंडविच कऊंटरवर गेलॊ. तेथे एका अवाढव्य काळ्या बाईने स्वागत केले, व्हेज. का नॊन-व्हेज. अशी पॄच्छा केली व तिचा हातमोजा बदलून व्हेज. सॆंडविच बनवू लागली. मी लगेच उकडलेला बटाटा पण घाला असं सागितलं. त्यावर तिने एक टिपिकल लुक दिला आणि, “डू यु वॊंट पोटॆटो सॆंडविच?”. मी म्हटल,”नो…बट आय वॊंट पोटॆटो इन दॆट सॆंडविच”….त्यावर चकित होऊन ती म्हणाली…आम्ही ह्यात बटाटा टाकत नाही…म्हंजे ती इंग्रजीत म्हणाली, मी मराठीत टंकले. दरम्यान माझ्या जोडीदारांनी ईंडीयन टेक अवे ची मेनुकार्ड पार चोथा करून टाकली होती…नाही नाही..म्हंजे कुठले स्वस्त आहे आणि कुठले जास्त ऒप्शन देईल ह्या बाबतीत चोथा केला होता,..पण जवळपास दर सगळेच सारखे होते. आता ह्यावर चर्चासत्र सुरु झालं. मी काळजीत पडलो होतो की आता पैसे वाचवताना ऊपाशी रहाव लागतंय का काय. बोलता बोलता मी, माझी ज्यांच्याबरोबर गट्टी जमली होती त्यांना माझे विचार ऐकवले. तेही माझ्यासारखेच गुट्गुटीत असल्यामुळे त्यांना माझ्या भावना लगेच कळल्या आणि ते म्हणे,”ईनको जाने दो भई…हम तो पेट भर के खायेंगे…वर्ना मजा क्या??”. माझा जीव भांड्यात पडला. आम्ही मग दररोज टेक अवे मधून जेवण मागवू लागलो.

आमच्या इन मधे एक सर्बियन मुलगी होती रिसेप्शनवर, ती खूप गप्पा मारायची. तिने सांगितलं,की जवळच वाल्थाम ऎबे गावात, टेस्को नावाचे एक सुपर स्टोअर आहे. तिथे कदाचित आम्हाला काही चांगले ऒप्शन्स मिळू शकतील. हे ऐकल्यावर आमच्या गोटात आनंदाच्या लाटा ऊठू लागल्या आणि ह्या शनी-रवि. टेस्कोला भेट द्यायची हे नक्की केले.